

कोल्हापुरात मित्राचा खांबाला गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
esakal
Kolhapur Crime News : शिवीगाळ केल्याच्या रागातून एकाने मित्राचा वायरने खांबाला गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार हॉकी स्टेडियम परिसरात घडला आहे. सिद्धू शंकर बनवी (वय २०, रा. कळंबा रिंग रोड, मूळ रा. हिरेनंदी, ता. गोकाक) असे मृताचे नाव आहे. पहाटे तीनच्यादरम्यान हा प्रकार घडला.