

कोल्हापूर महापालिकेतील निष्क्रिय आणि नकारात्मक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी चांगलंच फैलावर घेतलं.
esakal
Kolhapur Guardian Minister Prakash Abitkar : गेल्या बैठकीत तातडीच्या सूचना देऊनही डांबरी प्रकल्प सुरू करण्यास दोन-अडीच महिने लागतील, त्यासाठी अडीच कोटींचा खर्च येईल, असे सांगणाऱ्या शहर अभियंता रमेश मस्कर यांना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आजच्या बैठकीत चांगलेच फैलावर घेतले. या नकारात्मक मानसिकतेमुळेच कामे वेळेत होत नाहीत. कामात टाळाटाळ करणारे असे शहर अभियंता कशाला हवेत? त्यांना तातडीने पदमुक्त करा, अशा प्रकारची कामे करणाऱ्या इतरांनाही जमत असेल तर ठीक, नाही तर त्यांनाही पदमुक्त करा वा जमणारे काम द्या, अशा कडक सूचना प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना दिल्या.