

Kolhapur, Ichalkaranji Voting Begins Amid High Drama
esakal
Kolhapur Ichalkaranji Voting Begins : तब्बल दहा वर्षांनंतर होत असलेल्या व मंत्री, खासदार, आमदारांसह अनेक नेत्यांच्या प्रतिष्ठेच्या बनलेल्या कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज (ता. १५) मतदान होत आहे. इचलकरंजी महापालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. दोन्ही शहरांतील सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रथमच बहुसदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे मतदान होत असून कोल्हापुरात ३२७, तर इचलकरंजीतील २३० उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. या दोन्ही शहरांत असलेल्या प्रचंड ईर्षेमुळे कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात आहे.