"दत्त इंडिया'चा ऊस उदगाव येथे रोखला 

kolhapur jaysingpur sugarcane protest
kolhapur jaysingpur sugarcane protest

जयसिंगपूर - सांगलीच्या दत्त इंडिया साखर कारखान्याने एफआरपी न दिल्याने आंदोलन अंकुशच्या वतीने उदगाव (ता. शिरोळ) येथे ऊस वाहतूक रोखली. हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले तरी दत्त इंडियाने एफआरपी दिलेली नाही, असे असताना शिरोळ तालुक्‍यातून ऊसतोड सुरू आहे. एफआरपीच्या मागणीसाठी उदगाव येथे दत्त इंडियाकडे जाणारी वाहने बुधवारी रात्री रोखली. 

कायद्यानुसार चौदा दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक असताना हंगाम सुरू होऊन दोन महिने होऊनही एफआरपी दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शिरोळ तालुक्‍यातून दत्त इंडियाकडे जाणारी उसाची वाहने रोखून धरून कारखान्याचा निषेध केला. 

दरम्यान, दत्त इंडियाच्या व्यवस्थापनाबरोबर धनाजी चुडमुंगे यांची चर्चा झाली. यामध्ये कारखान्याच्या व्यवस्थापकाने सांगितले, की एकरकमी एफआरपी देणार आहोत; पण सांगली जिल्ह्यातील इतर कारखाने देऊ देत नाहीत. आता 2500 रुपये बिल काढले आहे. उर्वरित 388 रुपये लगेच देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर चुडमुंगे यांनी शुक्रवारपर्यंत निर्णय न झाल्यास शनिवारपासून सांगलीकडे जाणारी उसाची वाहने रोखण्याचा इशारा दिला. या वेळी बाळासाहेब वरेकर, दिलीप माने, श्रीकांत गावडे, अमोल माने, योगेश जाधव, नेताजी गावडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com