

कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात कैद्यांकडे जिवंत काडतूस आढळल्याने खळबळ उडाली आहे.
esakal
Kolhapur Kalamba Jail Crime News : कळंबा येथील कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथे असलेल्या पुण्याच्या आंदेकर गुंड टोळीच्या ‘मोका’मधील दोन आरोपींनी आणलेले जिवंत काडतूस सुरक्षारक्षकांनी स्वच्छतागृहात झडती घेऊन जप्त केले. याप्रकरणी कारागृहातील सुभेदार उमेश शामू चव्हाण (वय ५२ रा. तपोवन मैदानशेजारी,कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुरेश बळीराम दयाळू व अमीर ऊर्फ चंक्या असिर खान (रा. दोघे पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराने खळबळ उडाली असून, कारागृहाच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.