कोल्हापूर : केएमटीचा बुडत्याचा पाय खोलातच

डिझेल दर वाढले तरी तिकीट दर तीन वर्षांपूर्वीचेच; नियोजनाचा अभाव, अनास्था कायम
kmt
kmtsakal

कोल्हापूर : आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, अशीच काहीशी अवस्था कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाची अर्थातच केएमटीची झाली आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये बाजारात डिझेलचा प्रति लिटर दर ७६ रुपये असताना अस्तित्वात असलेले तिकिटाचे दर डिझेलचा भाव १०१ रुपये झाला असतानाही तेवढेच आहेत. योग्य नियोजनाचा अभाव आणि केएमटीची अनास्था यामुळे हा आतबट्ट्याचा व्यवहार महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. परिणामी केएमटी सुस्थितीत आणण्यापेक्षा केएमटीला खड्ड्यात घालण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केएमटीकडे पाठ फिरवल्यामुळे बुडत्याचा पाय खोलात याप्रमाणे केएमटीला अधिक संकटात ढकलण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे.

केएमटी सेवा सर्वसामान्यांच्यादृष्टीने मोठा आधार आहे. जगभरात वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत केली जात असताना महापालिका मात्र नेमका उलटा कारभार करत आहे. शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केएमटीला बंद पाडण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षरीत्या केला जात असल्याचे बोलले जात आहे.

kmt
प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंगला अटक; 'ती' चूक भोवली

ही सेवा तोट्यात असली तरी शहरातील विद्यार्थी, नोकरदार, कामगार, लघुउद्योजकांसाठी अत्यंत गरजेची आहे. आजूबाजूच्या २० ते ३० किलोमीटरच्या अंतरापर्यंत असलेल्या गावांनाही या सेवेचा लाभ होतो.

आर्थिक संकटात असलेल्या केएमटीला नुकसान भरून काढण्याची वेळ आता आली असताना अनेक बसेस बंद पडत आहेत. एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याचे लक्ष नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सध्या डिझेलचा भाव एकशे एक रुपये इतका आहे. केएमटीच्या एका बसला दररोज किमान ६० लिटर डिझेलची आवश्यकता असते, पण सध्या केएमटीचा तिकीट दर पहिला टप्पा दहा रुपये इतका आहे. त्यानंतर पुढच्या प्रत्येकी दोन किलोमीटर अंतराला दोन रुपये अशा पद्धतीने तिकीट आकारणी करण्यात येते. तिकिटाचे दर निश्चित करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रादेशिक प्राधिकरणाची मंजुरी लागते, पण असा कोणताही प्रस्ताव अद्याप तयार केला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com