

Kolhapur Leopard Rescue Video Brave Team Captures Leopard After Two Hour Struggle
Esakal
कोल्हापुरात ताराबाई पार्कातील हॉटेल वुडलँडसह परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला वनविभागाच्या पथकानं पकडलं. दोन तासात वनविभागाच्या पथकानं जाळी टाकून त्याला अलगद पकडल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. बिबट्याने हॉटेलमध्ये घुसून दोघांवर हल्ला केला. यात दोघे जखमी झाले आहेत. यानंतर बिबट्या महावितरणच्या कार्यालयाच्या परिसरात होता. ड्रेनेजमध्येही बिबट्या घुसला होता. पण त्याला अखेर पकडण्यात यश आलंय.