

BJP Shiv Sena alliance Kolhapur mayor
esakal
Kolhapur Mayor Election Update : महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवल्यानंतर आता महापौरांसह विविध पदाधिकाऱ्यांचे जागावाटप तीन-दोन या सूत्रानुसार निश्चित केले जात आहे. हा फॉर्म्युला ठरला तर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण सभापती हे प्रत्येक पद पाच वर्षांत भाजपला तीनवेळा, तर शिवसेना शिंदे गटाला दोनवेळा मिळेल, असे नियोजन केले जात आहे. यामुळे महायुतीच्या सत्ताकाळात पदांची खांडोळी करण्याचा पॅटर्न राबविला जाणार असल्याचे दिसते.