गाडीच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये हवा शिल्लक राहिल्यामुळे ब्रेक जाम झाले आणि गाडी धावू लागल्यानंतर घर्षणामुळे आगीची घटना घडली. यामध्ये फक्त ब्रेक शू जळले यानंतर बाकी चाकाला कोणताही धोका निर्माण झाला नाही.
मिरज, हातकणंगले : कोल्हापूर - मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसला (Kolhapur - Mumbai Mahalaxmi Express Fire) रुकडी ते हातकणंगले दरम्यान गाडीच्या वातानुकूलित एम - २ बोगीच्या चाकातील ब्रेकमध्ये तांत्रिक बिघाडातील प्रचंड घर्षणामुळे आग लागल्याची घटना घडली. घटने दरम्यान प्रवाशांनी वेळीच प्रसंगावधान राखत चेन ओढल्यामुळे पुढील अनर्थ टळला.