Kolhapur News: बिटकॉइनचा बहाणा सांगुन निवृत्त कर्मचाऱ्याची २२ लाखांची फसवणूक

याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय
Kolhapur News Retired employee defrauded of 22 lakhs on the pretext of Bitcoin
Kolhapur News Retired employee defrauded of 22 lakhs on the pretext of Bitcoin SAKAL

कोल्हापूर, ता. २९: बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवतो आणि प्रचंड नफा मिळवून देतो, असे सांगून २२ लाख १० हजार रुपयांचे धनादेश स्वतःसह वडील आणि पत्नीच्या खात्यात वटवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी स्वप्नील गजानन माताडे (वय ४८), गजानन यशवंत माताडे (वय ७०), रश्मी स्वप्नील माताडे (वय ४५, सर्व रा. बी १, बी २ यशवंत बंगला, केवीज पार्क, नागाळा पार्क) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kolhapur News Retired employee defrauded of 22 lakhs on the pretext of Bitcoin
Sukanya Mone - Sanjay Mone: "तर आपण एकमेकांना विसरुन जाऊ", लग्नापुर्वीच संजय मोनेंनी सुकन्याला सांगून टाकलं

याबाबतची फिर्याद वसंत निवृत्ती कांबळे (रा.ए/२, ६०७, इंद्रलोक स्वामी देवप्रकाश गार्डन, मोहनपूरमजवळ अंबरनाथ, पूर्व मुंबई) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत कांबळे हे निवृत्त असून, अमित माने यांच्याद्वारे त्यांची स्वप्नील माताडे याच्याशी ओळख झाली. स्वप्नीलने वसंत काबंळे यांचा विश्वास संपादन केला. ‘मी क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवतो. तुम्ही पण गुंतवा. बिटकॉईन हे परकीय चलन आहे. यामध्ये नफा मोठा मिळतो,’ असे त्याने कांबळे यांना सांगितले.

Kolhapur News Retired employee defrauded of 22 lakhs on the pretext of Bitcoin
Shubha Poonja: शुटिंग सुरु असतानाच लोकप्रिय अभिनेत्रीसोबत गुंडांनी केलं गैरवर्तन, चाकुचा धाक दाखवून...

त्यानंतर त्याने २२ लाख १० हजार रुपयांचे ९ चेक घेतले. हे चेक त्याने स्वतःच्या तसेच वडील गजानन माताडे आणि पत्नी रश्मी माताडे यांच्या खात्यात वटवले. वसंत कांबळे यांना याची कल्पना आली. त्यांनी स्वप्नील याच्या घरी जाऊन त्याच्या वडील आणि पत्नीच्या खात्यावर जमा झालेले पैसे परत मागितले, मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे वसंत कांबळे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com