

Kolhapur SIR Voter List
esakal
कोल्हापूर : मतदार यादी सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) मतदारांची प्रारूप यादी जाहीर करण्यात आली. याला १५ दिवस उलटून गेले, तरी अद्याप एकाही राजकीय पक्षाने याबाबत हरकत नोंदवलेली नाही. जे राजकीय पक्ष याबाबत पूर्वी आक्षेप घेत होते, त्यांनीही अद्याप हरकत नोंदवलेली नाही. नागरिकांकडूनही हरकत घेतली गेलेली नाही. त्यामुळे एक तर प्रारूप यादी योग्य आहे किंवा राजकीय पक्षांना यात आता रस नाही, असे दिसते.
‘एसआयआर’ कार्यक्रम सुरू झाला, त्यावेळी काही राजकीय पक्षांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ‘बीएलओं’ना पुरेशी माहिती नाही. नागरिकांनाही ‘एसआयआर’ कार्यक्रमाबाबत माहिती नाही. शहरात घरे न सापडल्याने अनेक नागरिक पात्र असूनही प्रारूप यादीत येणार नाहीत, अशा शंका राजकीय पक्षांनी उपस्थित केल्या होत्या.
याबाबतचे निवेदनही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, प्रत्यक्ष प्रारूप यादी जाहीर झाल्यानंतर एकाही राजकीय पक्षाने हरकत नोंदवलेली नाही. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालये, ग्रामपंचायती व प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर प्रारूप यादी प्रसिद्ध केली असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. ही यादी ऑनलाईनही उपलब्ध आहे. तरीही हरकती आलेल्या नाहीत. ज्यांचे नाव प्रारूप यादीत नाही ते अर्ज क्रमांक सहा भरून आवश्यक ती कागदपत्रे बीएलओंकडे देत आहेत. मात्र, राजकीय पक्षांनी मात्र पाठ फिरवल्याचे दिसून येते.
ज्या मतदारांच्या माहितीत विसंगती दिसून येते, असे जिल्ह्यात २ लाख २८ हजार मतदार आहेत. त्यातील एक लाख जणांना नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केली की, त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जाणार आहेत, अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.