

Soil Testing Initiative Launched
sakal
कोल्हापूर : ‘रासायनिक खते आणि पाण्याचा अमर्याद वापर, बदलती पीक पद्धती तसेच सेंद्रिय खतांचा अभाव यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. ज्याप्रमाणे आपले आरोग्य बिघडल्यावर आपण सर्व प्रकारच्या तपासण्या करूनच औषध घेतो, त्याचप्रमाणे मातीचेही परीक्षण करूनच उत्पन्न वाढीचे नियोजन केले पाहिजे’, असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.