Kolhapur : संशयाच्या वादातून थेट घाव...

महिन्याभरात जिल्ह्यात खुनाचे ८ प्रकार१० जणांनी गमावले प्राण
murder news
murder news esakal

कोल्हापूर : संशय अगर वादातून थेट घाव घालण्याची विकृती पुन्हा डोके वर काढू लागली आहे. महिन्याभरात जिल्ह्यात घडलेले आठ खुनाचे प्रकार हे त्याचे वास्तव म्हणावे लागेल.

क्षुल्लक कारण, वर्चस्व वाद, आर्थिक देव-घेव, हव्यास, प्रेमसंबंध, संशय अशा अनेक कारणांतून संबंधात कटुता निर्माण होते. यातूनच खटके उडण्यास सुरुवात होते. वेळीच मने मोकळी न झाल्याने गैरसमज वाढतात. समुपदेशन न झाल्याने चांगल्या, वाईट गोष्टींची जाणीव होत नाही. परिणामी, टोकाची कृती करणारी विकृती डोके वर काढते. अशाच कारणांतून महिन्याभरात आठ खुनांचे प्रकार घडले. संशय, वादासह लालसेतून थेट घाव घालण्याचे प्रकार घडले.

murder news
Kolhapur : शाही दसरा सोहळ्याची तयारी सुरू

चंदगड तालुक्यात वडिलांचा गळा आवळून खून करण्यात आला. तंबाखू न दिल्याने एकाला कोटीतीर्थ परिसरात दगडाने दोघांनी ठेचून मारले. लग्नास नकार दिल्याच्या कारणातून तरुणीचा गळा आवळून खून करून तरुणाने आत्महत्या केली. यादवनगरात गुंडाचा दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. कागल येथे पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह मुलगा, मुलगीचा गळा आवळून खून केला. गुप्तधन शोधण्याच्या तगाद्याला कंटाळून मांत्रिकाने महिलेचा डोक्यात वीट घालून खून केला.

murder news
Kolhapur : पारंपारिक शेतीला दिली आधुनिकतेची झालर

तरुणाने लग्नास नकार दिल्याच्या कारणातून महिलेचा कोयत्याने खून केला. इचलकरंजीत जुन्या वादातून व्यवस्थापकाने वहीफणी कामगाराचा खून केला. पाठोपाठ घडलेले हे सर्व प्रकार पोलिसदप्तरी नोंद झाले. त्याचा पोलिसांनी तातडीने छडा लावून संशयितांना जेरबंद केले. मात्र, यामध्ये दहा जणांना प्राण गमवावे लागले तर अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. त्याचबरोबर काही जीव पोरकेही झाले. रागाच्या भरात गैरकृत्य केलेल्यांवर पश्‍चाताप करण्याची वेळ आली आहे.

murder news
Kolhapur : अंबाबाईचा आज नगरप्रदक्षिणा सोहळा

जिल्ह्यातील खुनाच्या गुन्ह्यांची स्थिती

वर्ष दाखल उघड

२०१९ ४१ ४१

२०२० ४३ ४३

२०२१ ४७ ४२

२०२२ ३४ ३३ (ऑक्टोबर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com