
Kolhapur Crime
esakal
Kolhapur Crime News : आर. के. नगर, खडीचा गणपती, शांतिनिकेतन परिसरात झालेल्या सलग सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. चैनीसाठी महिलांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांना पकडण्यात आले. श्रेयस तुकाराम खाडे (वय १९, रा. रामानंदनगर) असे मुख्य संशयिताचे नाव असून, त्याचे दोन साथीदार अल्पवयीन असल्याचे समोर आले. सकाळी सोनसाखळी चोरल्यानंतर हे दागिने विकून तिघांनीही शहरातील नामांकित ‘थ्री स्टार’ हॉटेलमध्ये मजा केल्याचेही तपासात उघडकीस आले. चार लाखांचे दागिने त्यांच्याकडून जप्त करण्यात आले.