Kolhapur Viral Video Of Halgi DanceEsakal
कोल्हापूर
Viral Video: नाद खुळा...! कोल्हापूरच्या चिमुकल्यानं धरला हलगीवर ठेका, व्हायरल व्हिडिओचा धुमाकूळ
Viral Video Of Halgi Dance: आता कोल्हापूरातील हुपरीच्या एका सहा वर्षांच्या चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो हालगीचा ठेका धरताना दिसत आहे.
कोल्हापूर म्हटलं की, डोळ्यासमोर येतात रांगडी अन् मनमौजी लोकं. आपल्या दिलखुसलास वागण्यासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूरकर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात.
आता कोल्हापूरातील हुपरीच्या एका सहा वर्षांच्या चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो हालगीवर ठेका धरताना दिसत आहे.
या चिमुकल्याच्या व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजन त्याचे कौतुक करत आहेत. इतकेच नव्हे तर हातकलंगलेचे आमदार राजू आवळे यांनीही हा व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला आहे.

