ZP election counting update : कोल्हापूर जिल्हा परिषदेचा पहिला निकाल किती वाजता लागणार?, प्रशासनाची जय्यत तयारी

ZP election result : दुपारी १२ वाजता कोल्हापूर जिल्हा परिषदेचा पहिला निकाल जाहीर होणार असून सुरुवातीला टपाली मतांची मोजणी केली जाणार आहे. हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक फेऱ्या होणार.
Kolhapur Zilla Parishad election

Kolhapur Zilla Parishad election result

esakal

Updated on

Kolhapur Political news : कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी (ता. ९) सकाळी १० वाजता सुरू होईल. दोन फेऱ्यांमध्ये एका गटाचा निकाल हाती येईल. सर्वसाधारणपणे दुपारी १२ वाजेपर्यंत प्रत्येक तालुक्यातील एक ते दोन गटांचे निकाल जाहीर होतील. प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केली असून, २५० टेबलांवर १८८ फेऱ्या होणार आहेत. हातकणंगले तालुक्यात २२ फेऱ्या, तर उर्वरित सर्व तालुक्यांत १० ते १५ फेऱ्यांमध्ये निकाल हाती येईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com