esakal | स्वाभिमानीच्या 'मिस कॉल' मोहिमेस प्रारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

स्वाभिमानीच्या 'मिस कॉल' मोहिमेस प्रारंभ

स्वाभिमानीच्या 'मिस कॉल' मोहिमेस प्रारंभ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: एक रकमी एफआरपी मिळावी यामागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मिसकॉल मोहिमेस आज सुरवात झाली. राज्यातील जवळपास ५८ हजार शेतकऱ्र्यांनी मिस कॉल देत या आंदोलनात सहभाग नोंदवला. राज्यातील ज्या शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळावी यामागणीसाठी मिस कॉल करावेत असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी केले होते.

हेही वाचा: कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उघडले

त्यानुसार आज पासून मिस कॉल मोहीम सुरू झाली. दुपारी एक वाजल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विशिष्ठ मोबाईल क्रमाकांवर बहुतांशी शेतकऱ्यांनी मिस कॉल करीत या मोहिमेत सहभाग नोंदविला.

केंद्राने एफआरपीचे तुकडे करण्याबाबत राज्यांकडून म्हणणे मागवले आहे, पण त्याला महाराष्ट्राने विरोध केला नाही. याचा अर्थ राज्य सरकारही एफआरपीचे तुकडे करण्यास संमती दाखवत आहे. हे स्वाभिमानी शेतकरी संघटना कधीही खपवून घेणार नाही. असा इशारा शेट्टी यांनी दिला होता तसेच शेतकऱ्र्यांनी एफआरपी फोड करण्याला विरोध करण्यासाठी मिस कॉल मोहिमेत सहभाग घेण्याचे आवाहन केले होते.

शेतकऱ्यांचे सरकार म्हणून महाविकास आघाडीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्यातील पक्षही एक रकमी एफआरपीबाबत मौन बाळगले आहे. एफआरपीचे तुकडे केल्यास राज्यातील ऊस उत्पादक संकटात येणार आहेत. एफआरपीच्या तुकड्याच्या विरोधात आम्ही लढा उभारला असल्याचे मत शेट्टी यांनी सांगितले आहे. येत्या ३० सप्टेंबर पर्यंतही मोहीम आहे. त्यासाठी ८४४८१८३७५१ या क्रमांकावर शेतकऱ्यांनी मिस कॉल द्यावेत असे आवाहन स्वाभिमानीने केले आहे.

अऩ्यथा असे होईल नुकसान

एफआरपीचे तुकडे केल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार ६८० रूपयांचा पहिला हप्ता मिळेल. तर ५६० रूपयांचे उर्वरित दोन हप्ते तुकड्याने मिळतील.या सूत्राप्रमाणे राज्यातील इतर जिल्ह्यानाही रक्कम मिळेल. त्यामुळे ऊस उत्पादक मोठ्या संकटात येणार आहे असल्याचे स्वाभिमानी संघटनेचे मत आहे.

loading image
go to top