Leopard Viral Video

कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात तब्बल दोन महिने बिबट्या आणि त्याच्या बछड्याचे वास्तव्य असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

esakal

Leopard Viral Video : गाईला बघून घाबरला बिबट्या, सीसीटीव्ही फुटेज पाहून म्हणाल; कोल्हापुरी नाद खुळा...

Kolhapur Leopard : कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात तब्बल दोन महिने बिबट्या आणि त्याच्या बछड्याचे वास्तव्य असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या दृश्यांनी ग्रामस्थ थक्क झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Published on

Kolhapur Viral News : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील घुणकी येथील नवीन पाण्याचे फिल्टर हाऊस नजीकच्या सिद मळ्यातील चंद्रकांत बाळू सिद यांच्या घरानजीक सलग दोन रात्री बिबट्या येऊन गोट्यातील कालवडीशेजारी थांबून गेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ पाहणी न करता बिबट्यासह बछड्याला जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com