

कोल्हापूर शहरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. महावितरण कार्यालयात घुसलेल्या बिबट्याने तिघांवर हल्ला केल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
esakal
Kolhapur Leopard Update (संदीप खांडेकर) : कोल्हापूर शहरातील वुडलॅंड हॉटेल परिसरात घुसलेल्या बिबट्याने दोघांना जखमी केले. नितीन माळी व ओंकार काटकर अशी जखमींची नावे असून, हल्ल्यानंतर महावितरणच्या कार्यालयाच्या परिसरात बिबट्याने ठाण मांडले. शहरात बिबट्या घुसल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्यानंतर बघ्यांची परिसरात गर्दी झाली. दरम्यान, एका पोलिसाने बिबट्याला अडवण्याचा प्रयत्न केला यावर बिबट्याने थेट पोलिस कर्मचाऱ्यावरच हल्ला केला.