
कोल्हापुरात ऐन दिवाळीत धक्कादायक घटना, बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध दांपत्य ठार
esakal
Leopard Attack Kolhapur : (शाम पाटील शाहूवाडी) : कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील परळीनिनाई परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध दांपत्य ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही घटना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये रखूबाई निनो कंक (वय 70) आणि निनो यशवंत कंक (वय 75) या दांपत्याचा समावेश आहे. हे दोघे शाहूवाडी तालुक्यातील गोलीवणे गावचे रहिवासी असून, परळीनिनाई येथील बॅकवॉटर परिसरात शेळीपालनासाठी गेले होते.