

वूडलँड हॉटेलमधून बिबट्याने बीएसएनल कार्यालयात उडी घेतली. यानंतर तो पुन्हा महावितरण कार्यालयातील एका चेंबरमध्ये लपून बसला आहे.
esakal
Kolhapur Leopard (निवास चौगले) : कोल्हापूर येथील उच्चभ्रू वस्तीत असेलल्या हॉटेल वूडलँडमध्ये बिबट्या घुसल्याने एकच खळबळ उडाली. मुख्य रस्त्याला लागून असलेल्या एका बंगल्यातून बिबट्याने हॉटेलच्या गार्डनमध्ये उडी घेतली. त्याठिकाणी काम करत असलेल्या माळीवर हल्ला केला. यामध्ये माळी किरकोळ जखमी झाला. यानंतर हॉटेलमध्ये प्लेट स्वच्छ करत असेलल्या निखील कांबळे या युवकावरही हल्ला केला. वूडलँड हॉटेलमधून बिबट्याने बीएसएनल कार्यालयात उडी घेतली. यानंतर तो पुन्हा महावितरण कार्यालयातील एका चेंबरमध्ये लपून बसला आहे. दरम्यान त्याला पकडताना वनरक्षक ओंकार काटकर याच्यावर बिबट्याने हल्ला केला.