Loksabha Election : महाडिकांनी मला खासदार करण्यासाठी तन-मन-धन द्यावं; असं का म्हणाले महादेव जानकर?

‘मतदारसंघ निश्‍चित नाही, पण लोकसभा लढवणार आणि खासदार होऊन दिल्लीला जाणारच’
Mahadev Jankar Amal Mahadik
Mahadev Jankar Amal Mahadikesakal
Summary

जानकर हे बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवणार की माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

कोल्हापूर : ‘मतदारसंघ निश्‍चित नाही, पण लोकसभा लढवणार आणि खासदार होऊन दिल्लीला जाणारच’, असा ठाम विश्‍वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. त्यांच्या फंडातून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघासाठी मिळालेल्या पाच कोटींच्या निधीतील विविध विकासकामांचे उद्‌घाटन जानकर यांच्या हस्ते झाले. फुलेवाडीत हा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते.

जानकर हे एकीकडे भाजपवर (BJP) टीका करत आहेत तर दुसरीकडे माढा लोकसभा मतदारसंघांसाठी त्यांची महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू असल्याचे बोलले जाते. त्यामुळे जानकर हे बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवणार की माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Mahadev Jankar Amal Mahadik
Loksabha Election : सातारा लोकसभेसाठी भाजपने 'या' नेत्याला तिकीट द्यावं; रामदास आठवलेंनी नावंच केलं जाहीर

जानकर म्हणाले, ‘माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) आणि माझे खूप चांगले संबंध आहेत. मला आमदार करताना अमल महाडिक यांची मोठी मदत झाली आहे. या मदतीची परतफेड म्हणून त्यांच्या मतदारसंघासाठी पाच कोटी आणि जिल्ह्यासाठी सहा कोटींचा निधी दिला. माझा पक्ष छोटा आहे, महाडिक यांचा पक्ष मोठा आहे. महाडिक यांच्या पक्षातील अजून एक नेता माझ्या पक्षात कसा येईल, यासाठी माझा प्रयत्न आहे. राजकारणात आमचाही स्वार्थ आहे.’

Mahadev Jankar Amal Mahadik
Loksabha Election : लोकसभेसाठी 'हा' उमेदवार डोळ्यासमोर ठेवूनंच आमचं काम सुरू; मुश्रीफांनी कोणाचं घेतलं नाव?

ते पुढे म्हणाले, ‘भाजप, काँग्रेससारखे मोठे पक्ष आहेत. त्यांच्यावर छोट्या पक्षांनी अतिक्रमण केले पाहिजे. मीही खासदार होऊन लवकरच दिल्लीला जाणार आहे, त्यामुळे आणखी फंड देईन. अमल महाडिक यांनी मला खासदार करण्यासाठी तन मन धन द्यावं, अमल यांचं काम चांगले आहे. त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यासाठी मीही प्रयत्न करेन.’ यावेळी माजी आमदार अमल महाडिक, नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Mahadev Jankar Amal Mahadik
धैर्यशील मानेंचा पत्ता कट? हातकणंगलेतून कोरेंसाठी चाचपणी; फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर जोरदार हालचाली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com