

बेडकिहाळ येथील व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट (साखर कारखाना)ने केली आहे. याबाबत कार्यकारी संचालक स्वरूप महाडिक यांनी पत्रक जारी केले आहे.
esakal
Kolhapur Sugar Factory News : यंदाच्या २०२५-२६ च्या हंगामात गळितास येणाऱ्या उसाला प्रतिटन ३३५० रुपये दर देण्यात येणार असल्याची घोषणा बेडकिहाळ येथील व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट (साखर कारखाना)ने केली आहे. याबाबत कार्यकारी संचालक स्वरूप महाडिक यांनी पत्रक जारी केले आहे. यंदाच्या गळीत हंगामातील उसाला कारखान्याकडून ३३०० रुपये प्रतिटन एकरकमी देण्यात येणार आहे, तर राज्य सरकारकडून दिले जाणारे अनुदान ५० रुपये असे एकूण ३३५० रुपये बेडकिहाळ कारखान्याकडून दिले जाणार आहेत. दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांनी कारखान्याला अधिक ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.