
शक्तिपीठ महामार्गाच्या निर्मितीसाठी सरकारने अखेर निर्णायक पाऊल टाकले आहे. भूसंपादनाचा आदेश पारित करण्यात आल्याचे समोर आले आहे. या आदेशामुळे वर्धा ते सांगली जिल्ह्यापर्यंतचा मार्ग भूसंपादनासाठी खुला होणार आहे. मात्र कोल्हापूरकरांच्या तीव्र विरोधानंतर या आदेशातून कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे.