

Maharashtra kolhapur Youngest Congress candidate win
esakal
Kolhapur Congress victory news : (पंडित सावंत) : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या तिसंगी जिल्हा परिषद गटातील हाय होल्टेज दुरंगी लढतीत काँग्रेसच्या सोनाली विलास पाटील यांनी बाजी मारत भाजपच्या कल्पना एकनाथ शिंदे यांचा पराभव केला. सोनाली पाटील यांना ८९०७ मते मिळाली तर कल्पना एकनाथ शिंदे ३९८५ इतकी मते मिळाली. सोनाली पाटील ह्या ४९२२ मतांनी विजयी झाल्या. गगनबावड्यात सर्वच्या सर्व ६ जागांवर काँग्रेस विजयी. जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागांवर आपल्या विजय निश्चित केला आहे.