Kolhapur Fire : गोकुळ शिरगाव MIDC मध्ये केमिकल कंपनीला भीषण आग; संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी

कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये असलेल्या केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे.
Gokul Shirgaon MIDC Kolhapur
Gokul Shirgaon MIDC Kolhapuresakal
Updated on

Kolhapur Fire : कोल्हापुरात गोकुळ शिरगाव एमआयडीसीत (Gukul Shirgaon MIDC) एका केमिकल कंपनीला भीषण आग (Kolhapur Fire) लागलीये. या आगीमुळं एकच खळबळ उडाली. आग इतकी भीषण आहे की, संपूर्ण कंपनीला या आगीनं गिळंकृत केल्याचं दृश्य आहे.

Gokul Shirgaon MIDC Kolhapur
Joshimath Landslide : मंत्र्याचा थेट ISRO च्या संचालकांना फोन; वेबसाइटवरून तात्काळ हटवले 'ते' Photo

कोल्हापूर शहराला लागून असलेल्या गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये भीषण आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास कंपनीमध्ये आग लागली आहे. या आगीचे धुराचे लोट राष्ट्रीय महामार्गावरून दिसत आहेत. यावरून आगीची भीषणता लक्षात येते.

आज दुपारी चारच्या सुमारास ही आग कंपनीला लागली. ही आग कशामुळं लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून सगळीकडं मोठे धुराचे लोट दिसत आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली माहिती समोर आलेली नाही.

Gokul Shirgaon MIDC Kolhapur
Draupadi Murmu : राष्ट्रपतींच्या पाया पडणं आलं अंगलट; गंभीर चूक समजून महिला अभियंत्याचं तात्काळ निलंबन

प्राथमिक माहितीनुसार, कर्मचारी पहिल्यांदाच बाहेर पडल्याचं समजतं. मात्र, याबाबत अजून कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. जीवितहानी टाळण्यासाठी ॲम्बुलन्स आग लागलेल्या परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत. गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्या आहेत. केमिकल कंपनीत आग लागल्यानं इतर कंपन्यांकडं आग पसरू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. ही आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

Gokul Shirgaon MIDC Kolhapur
Mahabaleshwar मध्ये 40 मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात; पाहा मन हेलावून टाकणारे Photo

पेट्रोलियम कंपनीमुळं धोका : आग लागलेल्या कंपनीचं Ceraflux India प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असं नाव आहे. दरम्यान, त्या आग लागलेल्या कंपनीच्या शेजारीच एक पेट्रोलियम कंपनी असल्यानं मोठा धोका असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोल्हापूर मनपा, विमानतळ, एमआयडीसीमधील अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

सध्या आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. पण, आग आटोक्यात येताना दिसत नाहीये. याउलट आगीचा भडका वाढताना दिसतोय, त्यामुळं आजूबाजूच्या देखील कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. एकीकडं आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असताना परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमा झालीये, त्यामुळं घटनास्थळी पोलिसांची मोठी फौज दाखल झाली आहे.

Gokul Shirgaon MIDC Kolhapur
Air India : सीटवर लघवी केल्याच्या आरोपाला पीडितेचं सडेतोड उत्तर; मुंबईच्या मिश्राबद्दल सांगितली मोठी गोष्ट

नाशिक : जिंदाल कंपनीच्या आगीत 2 जणांचा मृत्यू

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमध्ये जिंदाल कंपनीला भीषण आग लागली होती. तब्बल 24 तासांनंतर ही आग आटोक्यात आली. या आगीत दोघांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले होते. मृत्यू झालेल्या दोन्ही कामगार या महिला आहेत. महिमा (वय 20) आणि अंजली (वय 27) असं मृत्यू झालेल्या महिलांची नाव आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com