

Major Fraud Case Kolhapur
esakal
Kolhapur Crime News : ‘अनेक लोकांची फसवणूक झाली आहे, त्याचा तपास योग्य होत नाही, अशावेळी पोलिस अधीक्षक म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही. तुम्ही आणि तपास अधिकाऱ्यांनी काय तपास केला, याचे वैयक्तिक प्रतिज्ञापत्र सादर करा’, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांनी तत्कालीन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना दिले.