

teacher convicted for sexual abuse of minor in kolhapur
esakal
Kolhapur Teacher Crime News : अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका शिक्षकाला आज २० वर्षे सक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मुहमंदतल्हा मुस्तफा शेख (वय २७, रा. मदिना मशिदीजवळ, यादवनगर) असे त्याचे नाव आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी ही शिक्षा सुनावली. नोव्हेंबर २०२१ मध्ये हा प्रकार घडला होता.