
Kolhapur Political News : कोल्हापूर जिल्ह्यातील वाठार तर्फे वडगाव गावातील साडेसात एकर जमीन बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेला भाडेतत्त्वावर देऊ केली आहे. ही जमीन गावाची असून, ती बेकायदेशीर पद्धतीने खोटी कागदपत्रे जोडून आणि फेरफार डायरीत खाडाखोड करून दिली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच ही जमीन परत मिळवण्यासाठी त्यांनी १५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले. काल उपोषणाचा १८ वा दिवस होता. यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी आमदार अशोकराव माने यांच्यावर ग्रामस्थानी प्रश्नांची सरबत्ती केली.