Shaktipeeth Highway esakal
कोल्हापूर
Shaktipeeth Highway : 'शक्तिपीठ'वरून राजू शेट्टींनी राजेश क्षीरसागरांविरोधात शड्डू ठोकला, बिंदू चौकात येण्याचं दिलं आव्हान
Kshirsagar Shetti Land Allegations : ‘शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करता करता आमदार राजेश क्षीरसागर इतके वाहवत गेले आहेत की, माझी पाचशे एकर जमीन असल्याचा जावईशोध त्यांनी लावला आहे.
Raju Shetti Land Controversy : ‘शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करता करता आमदार राजेश क्षीरसागर इतके वाहवत गेले आहेत की, माझी पाचशे एकर जमीन असल्याचा जावईशोध त्यांनी लावला आहे. या जागेचा सात-बारा घेऊन राजेश क्षीरसागर यांनी बिंदू चौकात यावे. शनिवारी (ता. २६) दुपारी बारा वाजता मी स्वत: बिंदू चौकात हजर राहतो. माझ्या नावावर पाचशे एकर जमीन असेल तर ती जमीन त्यांच्या नावावर करतो’, असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिले.