
डिबेंचरवरून शौमिका महाडिक आणि नविद मुश्रीफ यांच्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
esakal
Highlight Summary Points:
‘गोकुळ’ने प्रतिलिटर दराने फरक रक्कम जाहीर केली, पण वाटप टक्केवारीत केल्याने उत्पादकांना ४० ते ४५ टक्के कमी पैसे मिळाले.
म्हैस दुधासाठी ६.२८% व गाय दुधासाठी ८.०६% फरक दाखवला असला, तरी डिबेंचर कपातीमुळे उत्पादकांना फक्त ४.३% रक्कम मिळाली.
संघाला नफा आणि ठेवीत वाढ असूनही उत्पादकांच्या हक्काची कपात का, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित.
Kolhapur Gokul Dudh Sangh : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) दूध फरकाची रक्कम प्रत्यक्षात जाहीर केली. प्रतिलिटर पण संस्थांकडे ती टक्केवारीत आल्याने जाहीर केलेल्या रकमेपेक्षा कमी मिळालेले पैसे प्राथमिक दूध संस्थांतील उद्रेकाला कारण ठरले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘गोकुळ’ने केलेली ही चलाखी दूध उत्पादकांच्याही असंतोषाला कारण ठरण्याची शक्यता आहे.