Ajara Sugar Factory Election
Ajara Sugar Factory Electionesakal

Ajara Factory Election : आजरा कारखाना निवडणुकीतून दोन्‍ही राष्ट्रवादींची माघार; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी निवडणूक रिंगणातून माघार घेणार असल्याचे नेत्यांना कळवल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
Summary

राष्ट्रवादीच्या या निर्णयाबाबत तालुक्यात उलट- सुलट चर्चा रंगली आहे. हे धक्कातंत्र की दबावतंत्र अशीही राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत.

आजरा : आजरा साखर कारखान्याच्या निवडणूक (Ajara Sugar Factory Election) रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतल्याने तालुका व जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे धक्कातंत्र की दबावतंत्राचा भाग? याबाबत तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी निवडणूक रिंगणातून माघार घेणार असल्याचे नेत्यांना कळवल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या धक्कादायक गोष्टी घडत असताना कोल्हापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांची बैठक झाली. त्यामुळे बिनविरोधाची चर्चा कायम आहे.

Ajara Sugar Factory Election
Maratha Reservation : 'जे कुणबी असतील त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावेच लागेल'; काय म्हणाले मुश्रीफ?

वाढीव जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होती. सोमवारी कोल्हापुरात यासंदर्भात झालेल्या नेत्यांच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली होती. नेतेमंडळींनी सर्वपक्ष व गटातटांना जागा वाटपाचा मांडलेल्या फार्मुल्याबाबत दोनही राष्ट्रावादीच्या गोटात नाराजी असली तरी उघडपणे बोलून दाखवले जात नव्हते. काल सकाळी पालकमंत्री मुश्रीफ यांची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कागल येथे भेट घेतली.

Ajara Sugar Factory Election
Miraj Politics : काँग्रेसला धक्का देत सिद्धार्थ जाधवांचा ठाकरे गटात प्रवेश; 'या' मतदारसंघातून लढवणार निवडणूक?

निवडणूक बिनविरोध करून कारखान्याचे हित जपण्यासाठी रिंगणातून सर्वच जण माघार घेणार असल्याचे जिल्हा बॅंक संचालक (अजित पवार गट) सुधीर देसाई, राष्ट्रवादी गटाचे तालुकाध्यक्ष (शरद पवार गट) मुकुंदराव देसाई यांनी सांगितले. मात्र राष्ट्रवादीच्या या निर्णयाबाबत तालुक्यात उलट- सुलट चर्चा रंगली आहे. हे धक्कातंत्र की दबावतंत्र अशीही राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत.

आमदार विनय कोरे यांची घेणार भेट

आमदार विनय कोरे यांची कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोक चराटी, जयवंतराव शिंपी व पदाधिकारी बुधवारी (ता. २९) भेट घेणार आहेत. या वेळी निवडणूक बिनविरोध करण्यासह अन्य गोष्टींवर चर्चा होणार आहे. अन्य नेत्यांचीही याबाबतही भेट घेतली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com