धरणातील साठा कमी करण्याची गरज

किरणकुमार जोहरे; डिसेंबरअखेरपर्यंत पाऊस, पुन्हा पूरस्थितीची शक्यता
धरणातील साठा कमी करण्याची गरज
धरणातील साठा कमी करण्याची गरज

चंदगड : यंदा डिसेंबरअखेरपर्यंत पाऊस आणि पूरस्थितीची शक्यता आहे. सध्याच्या पावसामुळे कोयनेसह राज्यातील बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेकडे वाटचाल करत आहेत. संभाव्य पाऊस आणि पूरस्थितीचा विचार करता या धरणातील पाणीसाठ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. अन्यथा धरणे फुटून जीवित व वित्तहानी होऊ शकते, असा गंभीर इशारा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीचे माजी शास्त्रज्ञ तसेच ढगफुटी व हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिला आहे.

कृष्णा खोरेत सुमारे ३० लहान-मोठी धरणे आहेत. त्यात १०५ टीएमसीचे कोयना धरण आत्ताच ९९ टक्के पेक्षा जास्त भरले आहे, तर इतर मोठी धरणे ही ९८ टक्केपेक्षा जास्त भरली आहेत. या स्थितीत पुन्हा पावसाचा जोर वाढल्यास गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते, असे मत जोहरे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, "महाराष्ट्र हा ढगफुटीचा प्रदेश बनला आहे. २२ व २३ जुलैला तब्बल १०१ तर सात व आठ सप्टेंबरला ८५ पेक्षा जास्त ठिकाणी ढगफुटी झाली.

राज्यातील हवामान वेगाने बदलत असल्याचे ते निदर्शक आहे. ते अत्यंत गांभीर्याने घेऊन धरणातील पाणीसाठ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे."  हवामान शास्त्रज्ञ व जलव्यवस्थापन यांच्यात समन्वय नसल्याचा आरोप त्यांनी केला. या दोन विभागांत २४ तास समन्वय असायला हवा, असे मत व्यक्त केले.

धरणातील साठा कमी करण्याची गरज
पाटील नागालँडचे राज्यपाल, राऊत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष; एकमेकांचे खोचक टोले

जल व्यवस्थापन न केल्यास आणि पर्जन्यमान वाढल्यास कोयना व अन्य भरलेल्या प्रकल्पातील पाणी एकाच वेळी सोडावे लागेल. त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा सामना करावा लागेल.

भविष्यातील आपत्ती टाळण्यासाठी प्री डिझास्टर मॅनेजमेंट आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार घबराट न पसरवता नदीकाठच्या लोकांना व जनावरांना सुरक्षित स्थळी हलवणे, वृद्ध, आजारी रुग्ण, लहान मुले, गरीब कुटुंबांना प्राधान्यक्रमाने सुयोग्य स्थळी स्थलांतरित करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे.

जोहरे म्हणतात

  • पाणीसाठ्याचे व्यवस्थापन गरजेचे

  • हवामान शास्त्रज्ञ व जलव्यवस्थापन यांच्यात समन्वयाचा अभाव

  • आपत्ती टाळण्यासाठी प्री डिझास्टर मॅनेजमेंट आवश्यक

  • राज्यातील हवामान वेगाने बदलले

धरणातील साठा कमी करण्याची गरज
अनिल देशमुखांचे निवासस्थान, कॉलेजवर इन्कम टॅक्सचा छापा

राज्यातील प्रमुख धरणांतील

१२ सप्टेंबरचा पाणीसाठा असा

कोयना ९७.९४

धोम ८८.३८

कन्हेर ९३.६७

वारणा ९९.८३

दूधगंगा ९८.५०

राधानगरी ९८.५१

तुळशी ९९.२१

कासारी ९७.९९

पाटगाव ९८.५२

धोम बलकवडी ९९.२९

उरमोडी ८५.९९

तारळी ९५.६१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com