Kolhapur : कामगारालाच वडील घेणार होते दत्तक, मुलीने विरोध करताच कामगाराने...; काय घडलं?

Crime News Kolhapur : शेती व इतर कामासाठी म्हणून निलावतीच्या वडिलांनी अशोकला कामाला घेतले होते. दोन वर्षांपासून तो काम करत होता. त्यामुळे त्यालाच दत्तक घेण्याचा विचार तिच्या वडिलांचा होता.
Kolhapur
Kolhapuresakal
Updated on

Kolhapur Police : चंदनकूड (ता. गडहिंग्लज) येथे रॉडने डोक्यात हल्ला करून नवविवाहिता निलावती रामचंद्र व्हसकोटी हिला गंभीर जखमी केल्याप्रकरणी कुंबळहाळ (ता. गडहिंग्लज) येथील एकास पोलिसांनी अटक केली. अशोक श्रीकांत पाटील (वय ३७) असे या संशयिताचे नाव आहे. अशोक पाटील हा व्हसकोटी यांच्या घरी कामाला होता. त्याला दत्तक घेण्यासाठी निलावतीने वडिलांना विरोध केल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे त्याने कबूल केले आहे. उपनिरीक्षक विजय घाटगे यांनी माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com