कोल्हापूर : कार्यकर्त्यांची नाराजी कोणाच्या पथ्यावर?

पाडापाडीचे राजकारण; पाडण्याच्या ईर्ष्येतून धक्कादायक निकालाची परंपरा
North constituency by election Kolhapur Worker displeasure
North constituency by election Kolhapur Worker displeasure

कोल्हापूर : उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांत निर्माण झालेली नाराजी कोणाच्या पथ्यावर पडणार, याची उत्सुकता आहे. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे कार्यकर्ते नाराज आहेत, त्याचबरोबर काँग्रेसमध्येही भविष्याचे राजकारण डोळ्यांपुढे ठेवून कार्यकर्ते कार्यरत आहेत, त्यांचीही भूमिका महत्त्वाची असेल.

जिल्ह्यात निवडून कोणाला आणायचे यापेक्षा पाडण्यासाठीच मोठी ईर्षा असते. याची झलक २००९ व २०१४ लोकसभा निवडणुकीबरोबरच उत्तरच्या सर्वच निवडणुकीत पाहायला मिळाली आहे. अमुक उमेदवार नको म्हणून त्याच्या विरोधात रसद पुरवल्याने लोकसभेसह उत्तरमध्ये यापूर्वी धक्कादायक निकाल लागले आहेत. निवडून येण्याची क्षमता आणि खात्री असलेल्या काही दिग्गजांना त्यामुळे पराभवाची चव चाखावी लागली आहे. यावेळची स्थितीही वेगळी असेल असे चित्र नाही.

मतदारसंघातून यापूर्वी अनेकदा काँग्रेसची उमेदवारी नाकारलेला एक गट आहे. आपल्यासारख्या निष्ठावंतांना डावलून यापूर्वी काँग्रेसने इतरांना उमेदवारी दिल्याचा राग या गटाचा आहे. आता काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला तर २०२४ ला तर आपल्याला संधी मिळेल का नाही याविषयी हा गट साशंक आहे. त्यातून या गटातही नाराजीचा सूर आहे. ही नाराजीही दूर करणे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासमोरचे आव्हान असेल.

भाजपमध्येही निष्ठावंत आणि उपरा असा वाद सोशल मीडियावर रंगला आहे. भाजपचे उमेदवार सत्यजित कदम महाडिक गटाचे म्हणून ओळखले जातात. ‘महाडिक नको’ अशी मानसिकता असलेलाही गट आहे, त्याचेही पडसाद उमटणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यादृष्टीने ही जागा प्रतिष्ठेची असल्याने नाराजीवर त्यांच्याकडून कोणती ‘मात्रा’ दिली जाणार यावर पक्षाचा विजय अवलंबून आहे.

मते वळविण्याचे आव्हान

‘उत्तर’ हा आतापर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे; पण राज्यात शिवसेनेसोबत काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्रित आल्याने या मतदारसंघावरील शिवसेनेचा हक्का डावलला गेला. परिणामी, क्षीरसागर यांच्यासह त्यांना मानणारा कार्यकर्त्यांचा गट नाराज आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता म्हणून श्री. क्षीरसागर यांनी काँग्रेसला मदत करण्याचा शब्द दिला असला, तरी त्यांच्या कार्यकर्त्यांची मते काँग्रेसकडे वळविणे नेत्यांसमोर मोठे आव्हान आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com