Kolhapur Bandh : शिवरायांवर आक्षेपार्ह पोस्ट; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात, आज कोल्हापूर बंदची हाक

kolhapur bandh today news: राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेटसमुळे काल शहरात तणाव निर्माण झाला.
Kolhapur Laxmipuri Police Chhatrapati Shivaji Maharaj
Kolhapur Laxmipuri Police Chhatrapati Shivaji Maharajesakal

कोल्हापूर : राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेटसमुळे काल शहरात तणाव निर्माण झाला. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस (Laxmipuri Police) ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.

पोलिसांकडून कारवाईचे ठोस आश्वासन न मिळाल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. जमावाने लक्ष्मीपुरी बाजार, सीपीआर चौकासह परिसर, दसरा चौकात प्रार्थनास्थळांवरही दगडफेक केली.

परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी दसरा चौकात लाठीमार करून जमाव पांगविला. दरम्यान, आज (ता. ७) सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी चौकात हिंदुत्वावादी कार्यकर्ते (Hindu Association) एकत्रित जमणार आहे. आक्षेपार्ह स्टेटसच्या निषेधार्थ आज (ता. ७) कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.

दरम्यान, पोलिसांनी शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी परिसरातील स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दुपारी दोनपासून सुरू झालेला घटनाक्रम रात्री आठपर्यंत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या परिसरात धुमसत राहिला.

त्यामुळे सायंकाळी नंतर शहरात बंदसदृ‍श स्थिती राहिली.घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील काही भागातील महाविद्यालयीन तरुणांनी त्यांच्या सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस लावले. ही माहिती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना समजली.

Kolhapur Laxmipuri Police Chhatrapati Shivaji Maharaj
Akshay Bhalerao Case : आरोपीला काँग्रेसच्या आमदारानं लपवून ठेवलं; कवाडेंचा चव्हाणांवर गंभीर आरोप

संबंधितांवर कारवाई करावी, म्‍हणून काही हिंदुत्वावादी कार्यकर्ते थेट शाहूपुरी पोलिस ठाण्यात गेले. तेथे शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.

तेथे तातडीने संबंधिताला ताब्यात घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर कार्यकर्ते थेट लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आले. तेथे त्यांनी पोलिसांना संबंधिताला ताब्यात घेण्याची मागणी केली. यावेळी बहुतांशी कार्यकर्ते एकत्रित आले.

विक्रेत्यांच्या गाड्या उलटल्या

काही अधिकारी लक्ष्‍मीपुरी पोलिस ठाण्यात मोजक्या कार्यकर्त्यांसह चर्चा करताना बाहेर संतप्त झालेला जमाव थेट लक्ष्मीपुरी बाजारात घुसला. तेथे फळे विक्रेत्यांच्या गाड्या उलट्या केल्या. काही ठिकाणी दगडफेक केली.

यावेळी लक्ष्मीपुरी ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी वेळीच हस्तक्षेप करून नुकसान न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे संतप्त जमाव काही प्रमाणात शांत झाला. तेथून पुढे हा जमाव पुन्हा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आला. तेथे मोजके कार्यकर्ते आत चर्चाच करीत असल्यामुळे तेथील जमाव पांगला.

अधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये चर्चा...

पोलिस ठाण्यात उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक तानाजी सावंत, सतीशकुमार गुरव, श्रीकृष्ण कटकधोंड, राजेश गवळी यांनी हिंदुत्वादी संघटनेचे संभाजी (बंडा) साळोखे, उदय भोसले, ओंकार शिंदे, यश लोहार, प्रथमेश मेढे, दिलीप वाळा, पराग फडणवीस, सौरव निकम, सुमीत साठम, वैभव कवडी, सौरभ पवार, सुमीत पवार, किशोर तोडकर यांची समजूत काढली. संशयित दोघांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

टिके यांनी गर्दी न करण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न केले. कार्यकर्त्यांचा विश्‍वास देण्यासाठी संबंधितांना ताब्यात घेतल्याची छायाचित्रे पोलिसांनी दाखविली. त्यानंतर आणखी दोघांना अटक करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.

कारवाई सुरूच राहील, असे सांगितले. जमावाला शांत करण्यासाठी साळोखे, भोसले, शिंदे बाहेर आले; मात्र तोपर्यंत जमाव पांगला होता. त्या जमावाकडे पुन्हा हे कार्यकर्ते निघाले आणि तेथून पुढील परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर गेली.

...आणि दगडफेक सुरू झाली

लक्ष्‍मीपुरी पोलिस ठाण्यासमोरील जमाव पांगला तो थेट सीपीआर चौकाकडे गेला. तेथे पोलिस पोहोचण्यापूर्वीच जमावाने घोषणाबाजी केली. संतप्त जमावाने दगडफेक सुरू केली. पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ असल्याने ते काहीच करू शकले नाहीत.

अखेर पोलिसांची वाहने सायरन वाजवत तेथे आणली गेली. त्यावेळी जमावाने सीपीआर चौकातील हातगाड्यांवरील केळी आणि फळ विक्रेत्यांचे स्टॉल भिरकवले. त्याचवेळी तेथील प्रार्थनास्थळावर ही दगडफेक केली.

पोलिस आक्रमक होत असतानाच जमावाने थेट सीपीआरकडून भाऊसिंगजी रोडवरून पुढे चाल केली. यावेळी तेथे असलेल्या पोलिसांनी त्यांना तेथून मागे जाण्यास भाग पाडले. अखेर हा जमाव पुन्हा सीपीआर चौकात आल्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला. तेथे कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणाबाजी केली.

पोलिस तणाव पांगविण्याचे काम करतानाच तेथेही एका तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता; मात्र निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह महिला पोलिसांनी त्या तरुणाला संरक्षण देत तेथून त्याची सुटका केली. तेथून संतप्त जमाव थेट दसरा चौकात आला. यामुळे परिसरात मोठा तणाव होता.

Kolhapur Laxmipuri Police Chhatrapati Shivaji Maharaj
Dharashiv : 'तू तुझ्या औकातीत राहा भंगारचोर'; ठाकरे गटाच्या खासदारानं भाजप आमदाराला चांगलंच सुनावलं

पोलिसांचा लाठी हल्ला

जमाव पोलिसांच्या हाताबाहेर गेला होता. पोलिसांची कुमक दसरा चौकात होती. तेथे काही तरुणांनी एका इमारतीवर दगडफेक सुरू केली. यानंतर मात्र संतप्‍त झालेल्या पोलिसांनी थेट लाठीमार सुरू केला.

शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्यासह महिला पोलिसांनी सुद्धा दिसेल त्याच्यावर लाठी हल्ला सुरू केला. त्यामुळे जमाव चारही दिशांना पांगला. जलद कृती दलाने जमावाला पांगवण्यासाठी लाठीहल्ला केला. यावेळी झालेल्या पळापळीमुळे रस्त्यावर चपलांचा खच पडला होता.

याचवेळी काही कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या चौकात एक पोस्टर जाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे दसरा चौकातील सर्व पोलिस आणि कार्यकर्ते पुन्हा ट्रेझरी समोर आले. तेथे पोलिसांनी त्याबाजूला जाणारे रस्ते बंद करून शिट्ट्या वाजवून आपली ताकद दाखविली.

अखेर संभाजी साळोखे यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. आज (ता. ७) सकाळी छत्रपती शिवाजी चौकात जमण्याचे आवाहन करून ‘कोल्हापूर बंद’ची हाक दिली जाईल, असेही जाहीर केले. त्यानंतर जमाव पांगला; पण रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर दखल घेण्याइतपत गर्दी होती.

गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू

अक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी संबंधित दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू झाली आहे. ही मुले अल्पवयीन आहेत की नाहीत.

स्टेटस ठेवण्यास कोणी सांगितले आहे काय? यासह इतर चौकशी त्यांच्याकडे सुरू आहे. हिंदुत्वावादी कार्यकर्ते ओंकार शिंदे, यश लोहार यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद देण्याचे काम सुरू आहे. अक्षेपाहे स्टेटस ठेवणारी मुले ही एकाच कॉलेजमधील, एकाच वर्गातील आणि शहराच्या विविध भागातील आहेत.

Kolhapur Laxmipuri Police Chhatrapati Shivaji Maharaj
Kolhapur : छत्रपती शिवरायांवर आक्षेपार्ह पोस्ट; राजकीय नेत्यांनी कोल्हापुरातील जनतेला केलं 'हे' आवाहन

शांततेचे आवाहन

दुपारी दोन-अडीचपासून सुरू असलेल्या या घटनेची माहिती सायंकाळी सहाच्या सुमारास शहरात पसरली. त्यामुळे हिंदुत्वावादी कार्यकर्ते, भाजपचे माजी नगरसेवक, वेगवगेळ्या हिंदुत्वावादी संघटनांचे पदाधिकारी, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या परिसरात जमले होते. सर्वांनीच कार्यकर्त्यांना शांततेची भूमिका घेण्याचे आवाहन केले.

लक्ष्‍मीपुरी पोलिस ठाणे केंद्र बिंदू..

दुपारी अडीच ते रात्री उशिरपर्यंत लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे या सर्व घटनेचे केंद्र बिंदू राहिले. आजच्या घटनेमुळे पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी तातडीने देशभूषण हायस्कूल परिसर, बिंदू चौक, दसरा चौक, सीपीआर चौकात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला.

रात्री उशिरापर्यंत हा बंदोबस्त कायम होता. काही ठिकाणी या परिसरात जाण्यासाठी मार्ग बंद केला होता. काही ठिकाणी रस्त्यावर बांबू ठेवून तर काही ठिकाणी पोलिस व्हॅन उभा करून रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवले.

Kolhapur Laxmipuri Police Chhatrapati Shivaji Maharaj
Prashant Damle : 18 ते 35 वयातील तरुण पिढी नाटकाकडं यायला पाहिजे, पण तसं होत नाही; दामलेंनी व्यक्त केली खंत

झेंडे आणि दांडके

जमावाकडे भगवे झेंडे, हातात दांडके सुद्धा होते. त्यामुळे आजूबाजूला दिसेल त्यावर ते दांडके मारत होते. त्यामुळे फेरीवाल्यांचेही मोठे नुकसान झाले. तर काही कार्यकर्ते स्वतःहून पुढे जाऊन असे नुकसान करू नका म्हणून काही आक्रमक कार्यकर्त्यांना सांगत होते. मात्र, जमाव इतका आक्रमक होता की कोणीही कोणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

अशीही सेवा

सहाय्यक पोलिस निरीक्षक मेघा पाटील या साध्या वेशातच आज पोलिस ठाण्यात होत्या. त्यांची प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी जमाव पांगविण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला.

त्यांच्या हातातील काठीने अनेकांना शांत केले. त्यांच्या आक्रमक आणि समजावून सांगण्याच्या भूमिकेमुळे काही कार्यकर्ते सुद्धा नरमले. पाटील यांची भूमिका सर्वांना कौतुकास्पद वाटली. काही कार्यकर्त्यांनी नंतर त्यांना भेटून त्यांचे कौतुक केले.

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाईचे काम सुरू आहे. पोलिस ठाण्यासमोर आणि इतर ठिकाणी शांततेचा भंग करणाऱ्यावरही गुन्हे दाखल होणार आहेत.

कायदा व सुव्यस्थेचा विचार करून कोल्हापूर बंद करू नये, असे आवाहन केले आहे. कोणाही ‘ॲक्शन’ला ‘रिॲक्शन’ देऊ नये, असेही आवाहन अपर पोलिस अधीक्षकांनी केले आहे. सर्वांनी मिळून शांतता सलोखा ठेवावा, असे आवाहन आहे.

- महेंद्र पंडित, जिल्हा पोलिस अधीक्षक

बिंदू चौकात वादग्रस्त फलक

दोन दिवसांपूर्वी करवीर पोलिस ठाण्यात घडलेल्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर संबंधितांवर कारवाई करावी म्हणून वादग्रस्त फलकासह दोघांनी बिंदू चौकात आंदोलन केले.

या फलकावरील मजकूर आव्हान देणारा होता. पोलिसांना याची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी दोघांनाही त्या फलकासहीत ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

Kolhapur Laxmipuri Police Chhatrapati Shivaji Maharaj
Sindhudurg : शिंदे-फडणवीसांमुळं जनतेचं राज्य आलं असं वाटू लागलंय; राणेंचा उद्धव ठाकरेंना टोमणा

पोलिसांनी मिळविले नियंत्रण

दुपारी दोनच्या सुमारास तणावाला सुरुवात झाली, बघता बघता कार्यकर्त्यांचे लोंढेच्या लोंढे लक्ष्मीपुरीच्या दिशेने येऊ लागले.

अशा परिस्थितीत पोलिसांनी सुरुवातीलाच त्यावर नियंत्रण मिळवले असते तर त्यानंतर घोषणाबाजी, दगडफेक, तणाव झाला नसता. उशिरा का होईना पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि अनर्थ टळला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com