थायलंड-भारत व्यवसाय वाढवण्याची संधी

चेतन नरके ; ‘इंडो थाय ट्रेड शो’मध्ये सहभागाचे आवाहन
थायलंड-भारत व्यवसाय वाढवण्याची संधी

कोल्हापूर : पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन (एपीईसी) शिखर परिषदेचे यजमानपद थायलंडकडे आहे. त्याद्वारे भारत आणि थायलंडमधील व्यवसाय वृद्धीला मोठी संधी आहे. मार्च २०२२च्या शेवटच्या आठवड्यात ‘इंडो थाय ट्रेड शो’चे नियोजन केले आहे. येथे आपल्या व्यवसायाच्या सादरीकरणाची संधी आहे.

‘बिझनेस टू बिझनेस’ अशा पद्धतीचे आयोजन येथे असणार आहे. यामध्ये अधिकाधिक व्यावसायिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन थायलंड अर्थ मंत्रालयाचे वाणिज्य सल्लागार चेतन नरके यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले. यावेळी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे माजी अध्यक्ष अरुण नरके उपस्थित होते.

चेतन नरके म्हणाले, ‘‘दोन्ही देशातील उद्योजकांना उद्योग वाढीसाठी संधी देण्यात येणार आहे. यातून आर्थिक, गुंतवणुकीसह रोजगार व उद्योगाच्या नवनवीन संधी निर्माण होणार आहेत. येथे भारतातून सुमारे बाराशे, तर थायलंडमधून सुमारे साडेआठशे कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. २६, २७ आणि २८ मार्चला हा ‘शो’ असणार आहे. कोविड काळातही दोन्ही देशांत दहा महिन्यांत ५६ टक्के द्विपक्षीय व्यापारात वाढ झालेली आहे. सध्या दोन्ही देशांत १२.५ बिलियन डॉलरचा व्यवसाय होत आहे. भविष्यात तो आणखी वाढविण्याची संधी आहे.

श्री. नरके म्हणाले, ‘‘पर्यटन, बौद्ध तीर्थक्षेत्रांचे पर्यटन, हॉटेल फ्रॅंचाईझी, शेती, सेंद्रिय शेती, माती व्यवस्थापन, कृषी प्रक्रिया उद्योग, मसाले, इन्स्टंट फूड, मत्स्यपालन, डेअरी उद्योग, औषध निर्मिती यात उद्योगाला संधी आहे. तसेच आयुर्वैद, ज्वेलरी, कपडे, खेळणी, पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक वस्तू, खाद्य पदार्थ, शस्त्रे-दारूगोळा, रसायने, ऑटोमोबाईल शिक्षण, जाहिरात, चित्रपट व्यवसायात संधी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com