कोल्हापुरात अनावश्यक फिरणाऱ्यांची कोरोना तपासणी होणार

जिल्हाधिकारी दौलत देसाई; कोरोनामुक्त गाव करणाऱ्याचा होणार गौरव
कोल्हापुरात अनावश्यक फिरणाऱ्यांची कोरोना तपासणी होणार

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाचे (kolhapur covid-19 patients) रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. वाढलेला रुग्णदर कमी करण्यासाठी शहर व ग्रामीण भागात अनावश्यक घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना तपासणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या. (orders from collector daulat desai) 15 दिवसांत गाव कोरोनामुक्त करणारी ग्रामसमिती व सरपंचाचे विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) (breck the chain) प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. लोक घोळक्याने गप्पा मारत बसतात. जेवणाचे कार्यक्रम करतात. भाजी किराणा घेण्यासाठी गर्दी करतात. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यासाठी पोलिस व संबंधित स्थानिक प्राधिकरणाकडून याबाबत निर्बंध आणवेत. या पथकासोबत कोविडं तपासणी पथकही दिले जाईल. विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींची जाग्यावरच अँटीजन टेस्ट करण्यात येणार आहे. (antigen test)

कोल्हापुरात अनावश्यक फिरणाऱ्यांची कोरोना तपासणी होणार
ईडब्ल्यूएस देऊन काय दिवे लावले ? समरजितसिंह घाटगेंचा सवाल

जिल्हा बंदी अजूनही असल्यामुळे जिल्हा प्रवेशासाठी नागरिकांनी पास घेवूनच जिल्ह्यात प्रवेश करणे अपेक्षित आहे. परराज्यातील व्यक्तींच्या प्रवेशासाठी यापूर्वी शासनाने लागू केलेले निर्बंध लागू राहतील. संबंधिताकडे पासची तपासणी तसेच आवश्यकते प्रमाणे त्याचे थर्मल स्कॅनिंग, पल्स ऑक्सीमीटर तपासणी केली जाईल. त्याचबरोबर संशयित व्यक्ती आढळल्यास संबंधिताची अँटीजेन टेस्ट केली जाईल. तपासणीसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये फिरते वाहन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी देसाई म्हणाले, घर अपुरे असल्यास घरातील एका बाधित व्यक्तींकडून कुटुंबातील अन्य सदस्य बाधित होत असल्याचे आढळून येत आहे. यासाठी बाधित रुग्णांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यावर भर द्या. फिरते विक्रेते, अत्यावश्यक सेवेंतर्गत कार्यरत दुकानदार व कामगार, औद्योगिक क्षेत्रात कार्यरत कामगार, मजूर यांची अँटिजेन तपासणी करुन घ्या. तपासणीसाठी नकार देणाऱ्यांच्या विक्रीस बंदी घाला. नेमून दिलेल्या वेळे व्यतिरिक्त दुकाने सुरु असल्यास अशी दुकाने बंद करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.

महानगरपालिका व नगरपालिका हद्दीत रस्त्यांवर अनावश्यक कारणाने फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजेन तपासणी करुन घ्या. रुग्णसंख्या अधिक प्रमाणात असणाऱ्या शिरोळ, हातकणंगले व करवीर या तीन तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्रांत प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. ग्रामीण भागातील रुग्णदर कमी होण्यासाठी सरपंच व ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करायला हवेत. तहसीलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी ग्रामसमित्या व प्रभाग समित्यांच्या बैठका घ्याव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी गाव निहाय व प्रभाग निहाय सूक्ष्म नियोजन करुन प्रभावी अंमलबजावणी करावी. 15 दिवसांत गाव कोरोना मुक्त करणारी ग्रामसमिती व सरपंचाचे विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे असल्याचे ही जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.

कोल्हापुरात अनावश्यक फिरणाऱ्यांची कोरोना तपासणी होणार
कोकणात आंबेवाल्यांच्या लेकी-सुना असे करतात कष्ट

आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य गरजेचे आहे. तिसऱ्या लाटेत लहान बालकांचा धोका लक्षात घेऊन लहान बालकांसाठी सोयी सुविधा निर्माण करायला हव्यात. हेल्पलाईनद्वारे नागरिकांना उपलब्ध बेडची माहिती तात्काळ मिळवून द्यावी. तसेच व्हेंटिलेटरयुक्त बेड वेळेत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, कोविड सेंटरमधील रुग्णांच्या तब्बेतीच्या चढउतारावर लक्ष देऊन रुग्णांना आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा वेळेत उपलब्ध करुन द्याव्यात. शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिक देखील किरकोळ कारणासाठी बाहेर पडल्याचे दिसून येते.

महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण व जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत माहिती दिली.यावेळी, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उपायुक्त निखिल मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी उपस्थित होते.

कोल्हापुरात अनावश्यक फिरणाऱ्यांची कोरोना तपासणी होणार
"लशींची अडचण दूर करण्यासाठी शरद पवार करणार मध्यस्थी"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com