

आमदार यड्रावकरांच्या कारखान्याची ऊस वाहतूक रोखली, पोलिसांची अरेरावी; पोलिस निरिक्षकानेच आंदोलकांना दिल्या शिव्या...
esakal
Sugarcane News : ऊस दरप्रश्नी आंदोलन अंकुशच्या पदाधिकाऱ्यांनी चिपरी (ता. शिरोळ) येथील यड्रावकर इंडस्ट्रीजच्या प्रवेशद्वारात बेमुदत ठिय्या आंदोलनाला सोमवारपासून (ता. २७) सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत इंडस्ट्रीज प्रशासन आणि आंदोलकांमध्ये कोणतीही चर्चा झाली नसल्याने आंदोलन सुरूच होते. मात्र रात्री जयसिंगपूर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
दुपारी बारा वाजता आंदोलन अंकुशच्या पदाधिकाऱ्यांनी चिपरीतील यड्रावकर इंडस्ट्रीजच्या प्रवेशद्वारात ठिय्या मारून घोषणाबाजी केली. रविवारी शिरोळमध्ये एल्गार परिषद घेऊन गतवर्षी तुटलेल्या उसाचे दुसरा हप्ता प्रतिटन दोनशे रुपये तसेच यावर्षी तुटणाऱ्या उसाला प्रतिटन चार हजार रुपयांची मागणी केली आहे.