
Kolhapur Politics
esakal
जागा वाटपाचा गोंधळ – कोल्हापूर महापालिका निवडणुकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही; राज्य पातळीवर निर्णय होणार असतानाही स्थानिक स्तरावर दावे-प्रतीदावे सुरू असून महायुतीत बेबनाव दिसतो आहे.
नेत्यांत वर्चस्वासाठी स्पर्धा – खासदार धनंजय महाडिक यांनी भाजप-ताराराणी आघाडीच्या ३३ जागांसह आणखी १२ जागांचा दावा केला; आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेला किमान ३० जागांची मागणी केली.
कार्यकर्त्यांत घालमेल व बंडखोरीचा अंदाज – इच्छुक, नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून उमेदवारी द्यावी लागणार असल्याने कार्यकर्त्यांत संभ्रम; नेत्यांच्या वादामुळे बंडखोरीला खतपाणी मिळण्याची शक्यता.
Mahayuti Kolhapur News : महापालिका निवडणुकीतील जागा वाटप फार्म्युला अजून ठरलेला नाही, मुळात याचा निर्णय राज्य पातळीवरील नेत्यांचा, पण तत्पूर्वीच स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या दावे-प्रतीदाव्यामुळेच महायुतीतील बेबनाव समोर येत आहे. निवडणुकीपूर्वी आपल्या पक्षाचे वर्चस्व राहावे, हा त्यामागील हेतू असला तरी त्यामुळे कार्यकर्त्यांत मात्र चुकीचा संदेश जात आहे.