
Prakash Awade
esakal
जवाहर साखर कारखान्याच्या ३६व्या सभेत संचालक प्रकाश आवाडे यांनी येत्या गळीत हंगामात गाळपासाठी येणाऱ्या उसाला एकरकमी पैसे देण्याची ग्वाही दिली; साखरेचे दर पुढील काळात ठरवले जातील.
शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन वाढविण्यासाठी कारखान्यात एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू असून, यासाठी इचलकरंजीच्या डीकेटीई संस्थेचे सहकार्य घेतले जात आहे.
सभेत माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार राहुल आवाडे, स्वप्नील आवाडे, माजी अध्यक्ष उत्तम आवाडे यांसह मान्यवर उपस्थित होते; सत्कार सोहळाही पार पडला.
Kolhapur Sugarcane News : बाळासाहेब कांबळे : येत्या गळीत हंगामात गाळपासाठी येणाऱ्या उसाला किती दर देणार ते सांगत नाही; पण एकरकमी पैसे देणार, अशी ग्वाही कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे संचालक, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी आज दिली. कारखान्याची ३६ वी सभा आज झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते.