‘ब्रेक दी चेन ; इचलकरंजीत ‘मल्टीलेयर फिल्टरेशन मास्कची निर्मिती.....

Production of quality masks in Ichalkaranji kolhapur marathi news
Production of quality masks in Ichalkaranji kolhapur marathi news

इचलकरंजी  (कोल्हापूर) :  कोरोना संसंर्गाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी ‘मल्टीलेयर फिल्टरेशन मास्कची‘ निर्मिती करण्यात आलेली आहे. तयार मास्कची सेंटर ऑफ एक्सलन्स इन नॉनवोव्हन येथील अत्याधुनिक मशीनरीवर विविध गुणधर्मासाठी चाचणी करण्यात आलेली आहे.वस्त्रोद्योग शिक्षण देण्यासाठी  देशात नामांकित असलेल्या येथील डीकेटीईच्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन नॉनवोव्हन आणि इचलकरंजी गारमेंट क्लस्टर  यांच्या संयुक्त विद्यमाने हे मास्क विकसित करण्यात आले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक दी चेन‘ या टायटलखाली दोन्ही संस्थांच्या संयुक्त विदयमाने समाजाच्या हितासाठी हा उपक्रम राबीवला आहे.जगभरात कोरोनाच्या संकटाचे वादळ निर्माण झाले आहे या परिस्थीतीचे गांभिर्य लक्षात घेवून समाजउपयोगी उपक्रम म्हणून  गुणवत्तापूर्वक मास्कची डीझाईन करुन त्याची निर्मिती करण्यात येत आहे.

यांच्यासाठी मास्कअतिउपयुक्त

 तयार मास्क हे पेालिस कर्मचारी, वैदयकीय कर्मचारी, आपत्कालीन परिस्थीतीत सेवा बजविणरे अधिकरी, सरकारी अधिकारी,सफाई कर्मचारी, दुध पुरवठा करणारे व्यक्ती या सर्वानांच कोरोनाच्या भीषण संसर्गापासून सुरक्षा प्रदान करण्यास अत्यंत महत्वाचे आहेत. हे गरजु व्यक्तीपर्यंत पोहचण्याचे काम डीकेटीई सीओई व गारमेंट क्लस्टर कडून वेगाने सुरु आहे.

‘ब्रेक दी चेन‘
डीकेटीईच उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, डीकेटीई सीओई च्या एक्झुकीटीव्ह डायरेक्टर शिल्पा आवाडे (दुधाणे), डायरेक्टर डॉ पी.व्ही. कडोले, गारमेंट क्लस्टरचे स्वप्नील आवाडे, जिल्हापरिषद सदस्य राहुल आवाडे यांनी प्रत्येक्ष सेंटर ऑफ एक्सलन्स इन नॉनवोव्हन व गारमेंट क्लस्टर ला भेट दिली व तयार मास्कची पाहणी केली. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे मल्टीलेयर फिल्टरेशन मास्क  बनविण्यात यश आले.

हेही वाचा- प्राध्यापकांकडून कोरोना विरुद्ध लढाईसाठी एक दिवसाचे वेतन दिले जाणार... - ​
मास्क चे गुणवैशिष्ट्ये
हे मास्क तीन लेयर पासून बनविण्यात आलेले आहे. बाहय व आतिल आवरण हे कॉटन कापाडापासून तर मधील आवरण हे नॉनवोव्हन कापडापासून बनविण्यात आले आहे. नॉनवोव्हन कापड हे रोगजनक द्रवापासून संरक्षण देते तर कॉटन कापडामध्ये आद्रता शोषण्याची क्षमता असते.
तयार मास्कची सेंटर ऑफ एक्सलन्स इन नॉनवोव्हन येथील अत्याधुनिक मशीनरीवर विविध गुणधर्मासाठी चाचणी करण्यात आलेली आहे. तयार मास्क परिधान केल्याने वातावरणातील धुळ,प्रदुषण,वायरस संक्रमण यापासून संरक्षण मिळते.तसेच बोलताना, खोकला आल्यानंतर किंवा शिंकताना बाहेर पडणा-या द्रवापासून देखील हे मास्क संरक्षण प्रदान करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com