तब्बल चार दिवसांनी पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्ग सुरु

तब्बल चार दिवसांनी  पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्ग सुरु
Updated on

शिरोली पुलाची (कोल्हापूर) : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune Bangalore National Highway) वाहतूक तब्बल चार दिवसांनी सकाळी दहा वाजता सुरू झाली. कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे एक फूट पाण्यातून सुरवातीला पाण्याचा टँकर सोडण्यात आला. त्यानंतर पाणी, पेट्रोल, डिझेल, दूध, ऑक्सीजन व मालवाहतूक (Water, petrol, diesel, milk, oxygen) ही अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहणे सोडण्यात आली. महामार्गावर एका बाजूला सुरक्षीततेसाठी पॉकलॅड उभा करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहन कोल्हापूरात पोचल्याने, शहरातील पेट्रोल, डिझेल उपलब्ध होणार आहे. तसेच पुणे महापालिकेचे पाण्याचे टॅंकर शहरात पोचले आहेत, त्यामुळे शहरात टॅंकरने पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

तब्बल चार दिवसांनी  पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्ग सुरु
अजित पवारांच्या दौऱ्यात बदल; सांगलीकडे रवाना

प्रवाशी वाहतूक सुरू झालेली नाही

कोल्हापूरहून पुणेच्या दिशेने जाणार्‍या मार्गावर अजून तीन फूट पाणी आहे. त्यामुळे पुण्याकडील वाहतूक सुरळीत होण्यासाठी वेळ लागणार आहे. महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू झाल्याने, प्रवासात अडकलेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. अवजड वाहतूक सुरू झाली असून, प्रवाशी वाहतूक सुरू झालेली नाही. त्यामुळे महामार्ग सुरू झाला असे समजून कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Forest Department action
Who is Dr Sriram Saran?
Kolhapur Ring Road development project
Dr D Y Patil educational contribution
Marathi News Esakal
www.esakal.com