

Pune Bangalore Highway Blockade
esakal
Pune Bengaluru Highway Traffic Update : साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) प्रतिकिलो ५० रुपये आणि इथेनॉलचा दर वाढविण्याच्या मागण्यांवर केंद्र सरकारसोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानुसार आज मंगळवारी (ता. १३) सकाळी अकरा वाजल्यापासून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात येणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी संघटना विविध ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याने महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.