Radhanagari Dam : राधानगरी पन्नास टक्के भरले; जिल्ह्यातील इतर धरणांतील पाणीसाठा मात्र चिंताजनक

राज्यात चांगल्या पावसाचा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख
radhanagari dam 50 percent water level monsoon rain weather kolhapur
radhanagari dam 50 percent water level monsoon rain weather kolhapuresakal

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरण आज ५० टक्के भरले. या धरणात गेल्यावर्षी १६ जुलैला ५.६५ टीएमसी पाणीसाठा होता, यावर्षी तो ४.१८ टीएमसी झाला आहे; तर काळम्मावाडी धरणात गेल्यावर्षी १४.६३ टीएमसी पाणीसाठा, त्या तुलनेत यावर्षी केवळ ५.८ टीएमसी पाणीसाठा आहे.

राधानगरीतील पाणीसाठा दिलासा देणारा असला, तरी जिल्ह्यात सर्वच धरणे आणि प्रकल्पांमध्ये सध्याचा पाणीसाठा चिंताजनक स्थितीत असल्याचे चित्र आहे. ते बदलण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

राज्यात चांगल्या पावसाचा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. यावर्षी यामध्ये खंड पडण्याची चिन्हे आहेत. पावसाने दिलेल्या ओढीमुळे धरणांमधील पाणीसाठा म्हणावा तेवढ्या गतीने वाढलेला नाही. दूधगंगा (काळम्मावाडी) धरणाची परिस्थिती तर खूपच बिकट आहे.

radhanagari dam 50 percent water level monsoon rain weather kolhapur
Kolhapur Rain Update : चिंता वाढली! पंचगंगेसह नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने घट; 'राधानगरी'तून विसर्ग पूर्णपणे बंद

या धरणाची एकूण क्षमता २५.३९ टीएमसी इतकी आहे. यापैकी किमान १९ ते २० टीएमसी पाणीसाठा झाला, तर या धरणावर अवलंबून असणाऱ्या ४१ हजार हेक्टरवरील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देता येते.

गेल्यावर्षी याच दिवशी (१६ जुलै) या धरणात १४.६३ टीएसमी पाणीसाठा होता. आज तो केवळ ५.२४ टीएमसी इतकाच आहे. वारणा धरणामध्येही गेल्यावर्षीच्या तुलनेत दहा टीएमसीपाणी कमी आहे. तुळशी, कासारी, पाटगाव प्रकल्पामध्येही एक टीएमसीने पाणी कमी आहे.

radhanagari dam 50 percent water level monsoon rain weather kolhapur
Kolhapur Politics : 'कोल्हापुरात CM शिंदेंची तोफ धडाडणार; सभेत दिसणार शिवसैनिकांच्या गर्दीचा महापूर'

जिल्ह्यात अजून अडीच महिने पाऊस होईल. अशाच पध्दतीने पाऊस राहिला, तर राधानगरी धरण भरण्याची अपेक्षा आहे, मात्र इतर धरणांच्या पाणी पातळीत वाढ होण्यासाठी मुसळधार पावसाची नितांत गरज आहे. वारण, दूधगंगा ही महत्त्वाची धरणे भरल्याशिवाय पुढील वर्षी शेती, उद्योग तग धरू शकणार नाहीत. शहराला होणारा पाणीपुरवठा लक्षात घेता. काळम्मावाडीत पाणी पातळी वाढण्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

राऊतवाडी धबधब्यावर गर्दी

गेल्या आठ दिवसांच्या पावसामुळे पर्यटकांसाठी खुला असलेला बेनझर व्हिला बंद झाला असून, त्याच्या शेजारी असलेला राऊतवाडी धबधबा पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.

radhanagari dam 50 percent water level monsoon rain weather kolhapur
Kolhapur Crime : उचगावात पत्नीचा विनयभंग; दोन गटांत तुफान हाणामारी, 10 जण जखमी

जिल्ह्यातील धरण/ प्रकल्पांतील तुलनात्मक पाणीसाठा

धरण/प्रकल्प-एकूण क्षमता- १६ जुलै २०२३-१६ जुलै २०२२

राधानगरी- ८.३६- ४.१८- ५.६५

तुळशी- ३.४७- १.०१- २.२८

वारणा- ३४.३९- १५.३६- २३.७५

दूधगंगा- २५.३९- ५.२४ - १४.६३

कासारी- २.७७- १.२२- १.९७

कडवी- २.५१- १.१५-१.८५

कुंभी- २.७१- १.४६ - १.७६

पाटगाव- ३.७१- १.४७- २.३८

चिकोत्रा- १.५२- ०.४७ - १.०२

चित्री- १.८८- ०.४५- १.२९

जंगमहट्टी- १.२२-०.३६- १.०३

घटप्रभा- १.५६- १.५६- १.५६

जांबरे- ०.८१- ०.५९- ०.८२

आंबेओहोळ- १.२४- ०.४१- १.०९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com