Kolhapur Politics : 'कोल्हापुरात CM शिंदेंची तोफ धडाडणार; सभेत दिसणार शिवसैनिकांच्या गर्दीचा महापूर'

शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे दौऱ्यावर येत आहेत.
Eknath Shinde Rajesh Kshirsagar
Eknath Shinde Rajesh Kshirsagaresakal
Updated on
Summary

मेळावा यशस्वी करून कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद दाखविण्याची संधी पुन्हा शिवसैनिकांना मिळणार आहे.

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा मेळावा यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी व शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी येथे केले. मुख्यमंत्री शिंदे शुक्रवारी (ता. १४) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

सायंकाळी पाच वाजता शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा मेळावा होणार आहे. त्याच्या नियोजनासाठी शाहू स्मारक भवनात बैठकीचे आयोजन केले होते. शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे दौऱ्यावर येत आहेत.

Eknath Shinde Rajesh Kshirsagar
Vaibhav Naik : ..म्हणून शिंदे गटाचे 'ते' 16 आमदार अपात्र होणार; सुप्रीम कोर्टाचा दाखला देत नाईकांचं स्पष्टीकरण

दौऱ्यातील पेटाळा मैदानावरील सभेस शिवसैनिकांच्या गर्दीचा महापूर दिसेल, असा विश्‍वास क्षीरसागर यांनी या वेळी व्यक्त केला. मेळावा यशस्वी करून कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद दाखविण्याची संधी पुन्हा शिवसैनिकांना मिळणार आहे. जिल्ह्यात शिवसेना क्रमांक एकचा पक्ष होण्यासाठी या मेळाव्याद्वारे रणशिंग फुंकले जाणार आहे.

Eknath Shinde Rajesh Kshirsagar
CM Siddaramaiah : 'ते' सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

यासाठी पदाधिकाऱ्यांनी विभागात, गावात बैठका घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या वेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी, विधान परिषदेचे आमदारपद क्षीरसागर यांना मिळावे व त्यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री व्हावे, अशीही इच्छा व्यक्त केली. जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजित जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. अंकुश निपाणीकर यांनी प्रास्ताविक केले.

Eknath Shinde Rajesh Kshirsagar
NCP Crisis : 'शरद पवार आपला ब्रॅण्ड, ते वर्षात पुन्हा पक्ष उभा करणार'; रत्नागिरीत साहेबांच्या समर्थनार्थ मेळावा

बैठकीस माजी नगरसेवक राहुल चव्हाण, नंदकुमार मोरे, रमेश खाडे, प्रा. शिवाजी जाधव, किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, उदय भोसले, अविनाश बनगे, मंगलताई साळोखे, पूजाताई भोर, पवित्रा रांगणेकर, गौरी माळदकर, गीता भंडारी, सुनीता भोपळे, शाहीन काझी, पूजा कामते यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com