

Rahul Awade Trolled
esakal
Rahul Awade Viral Post : राहुल गांधी यांच्या एका व्हायरल व्हिडिओवरून त्यांच्यावर टीका करत आमदार राहुल आवाडे यांनी सोशल मीडियावर आक्रमक पोस्ट केली; मात्र, ही पोस्ट त्यांच्याच अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे. आवाडे यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्समधून त्यांना चांगलेच सुनावले असून, काहींनी त्यांच्या राजकीय भूमिकेची आठवण करून देत थेट सवाल उपस्थित केले आहेत. ‘राहुल साहेब, तुमचे नाव राहुल गांधी यांच्या नावावरून ठेवले असल्याची आठवण ठेवा,’ अशी टिप्पणी करत एका नेटकऱ्याने आवाडेंना टोला लगावला आहे.