
अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्यामुळे सकाळी आठच्या सुमारास काही काळ वाहतूक बंद होती.
पन्हाळा ते चंदगड; कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचे अपडेट, वाचा एका क्लिकवर
कोल्हापूर - विशाळगडावर जाण्यासाठी असलेल्या लोखंडी जिन्याच्या बाजूचा दगडी बुरूज कोसळला आहे. लोखंडी जीना वाहतुकीसाठी बंद केला आहे. पर्यायी मार्गाने लोक गड्यावर ये-जा करीत असल्याची माहिती शाहूवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय पाटील यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास दिली आहे. यानंतर पोलिस अधीक्षक शैलेश बलवकडे यांच्या आदेशानुसार तेथे बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Kolhapur district rain update on one click)
इशारा - कासारी मध्यम प्रकल्प गेळवडे (ता.शाहूवाडी) येथे धरण व पाणलोट क्षेत्रात अतीवृष्टीने धरणाच्या पाण्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे विसर्ग सुरू आहे. परिणामी कासारी नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.
हेही वाचा: गॅंगस्टर शेखु खानच्या भावाचा नागपुरात निघृण खून, गट्टूने केला वार
अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्यामुळे सकाळी आठच्या सुमारास काही काळ वाहतूक बंद होती. सुमारे तासाभरांनी दरड बाजूला काढल्यामुळे दिवसभरात घाटात एकेरी मार्गाने वाहतुक सुरू झाली असल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात ३५. ७ मिलीमीटर सरासरी पाऊस
जिल्ह्यात गुरूवारी सकाळी आठपर्यंत संपलेल्या २४ तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 77.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे तालुकानिहाय पाऊस मिलीमीटर मध्ये असा - हातकणंगले- 14.6, शिरोळ -8.8, पन्हाळा- 43.4, शाहूवाडी- 48.4 , राधानगरी- 51.1, गगनबावडा-77.7, करवीर- 30.2, कागल- 26.3, गडहिंग्लज- 18.9, भुदरगड- 48.3, आजरा-39, चंदगड-72.7, असा एकूण सरासरी 35.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.
हेही वाचा: मुंबईकरांनो काळजी घ्या! येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा - IMD
सकाळ सात पर्यंत जिल्ह्यात 58 बंधारे पाण्याखाली
राधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग
राधानगरी धरणात 144.56 दलघमी पाणीसाठा आहे.
सकाळी 7 वाजता राधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग
सकाळी सात वाजताची स्थिती
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे, राशिवडे, शिरगांव व तारळे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व बाजारभोगाव, कडवी नदीवरील-सवते सावर्डे, शिरगांव, सरुड पाटणे व कोपार्डे, वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे, गारगोटी, शेणगांव व शेळोली, घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे, हिंडगांव, तारेवाडी व अडकूर, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदूळवाडी, शिगांव, खोची, चावरे व दानोळी, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली व सुळंबी, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, वेतवडे व मांडूकली, तुळशी नदीवरील- बीड व आरे, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी व चंदगड, धामणी नदीवरील- सुळे, पणुंद्रे व आंबर्डे, हिरण्यकेशी नदीवरील- निलजी असे 58 बंधारे पाण्याखाली आहेत.
हेही वाचा: Rain Live Updates : गुजरात - दमणगंगा नदीवरील मधुबन धरणातून पाण्याचा विसर्ग
आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 144.56 दलघमी, तुळशी 58.98 दलघमी, वारणा 609.98 दलघमी, दूधगंगा 368.73 दलघमी, कासारी 55.82 दलघमी, कडवी 46.82 दलघमी, कुंभी 46.32 दलघमी, पाटगाव 62.52 दलघमी, चिकोत्रा 26.70 दलघमी, चित्री 30.37 दलघमी, जंगमहट्टी 22.48 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, आंबेआहोळ 28.08 जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 36.10 फूट, सुर्वे 35.1 फूट, रुई 65 फूट, इचलकरंजी 60.6 फूट, तेरवाड 55.3 फूट, शिरोळ 47.9 फूट, नृसिंहवाडी 47.6 फूट, राजापूर 35.9 फूट तर नजीकच्या सांगली 19.3 फूट व अंकली 24.2 फूट अशी आहे. दरम्यान, दुपारी 1 च्या सुमारास राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 37.2 फूट इतकी आहे. सकाळापासून जिल्ह्यातील काही भागांत पावसाने उघडझाप सुरु केली आहे.
हेही वाचा: Mumbai Rain Live: पुढील २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा
Web Title: Rain Update In Kolhapur District From Panhala To Chandgad Read With One Click
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..