
Fake Cash Bundle Scam : दिल्ली येथे व्यापारासाठी तातडीने रक्कम हवी असल्याचे भासवत भामट्याने कोऱ्या कागदांचे बंडल बेदाणा व्यापाऱ्याचा हाती टेकवून पोबारा केला. संशयिताने कोल्हापुरात व्यापाऱ्याला दिलेल्या बंडलमध्ये केवळ १० हजार रुपयांच्या खऱ्या नोटा असल्याचे समोर आले. हे बंडल देताच दिल्लीमधील त्याच्या साथीदारांनी संबंधित व्यापाऱ्याच्या मित्राकडून ५० लाख रुपये घेतले. शहरातील टेंबलाई उड्डाणपुलानजीक सात ऑगस्टला घडलेल्या या प्रकाराबाबत राजेश लक्ष्मीनारायण मुंदडा (वय ५४, रा. अंबाईनगर, सांगली) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.