
Amal Mahadevrao Mahadik
esakal
छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या अध्यक्ष अमल महाडिक आणि सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे कारखाना कर्जबाजारी झाला असल्याचा आरोप दत्तात्रय उलपे यांनी केला.
उलपे यांनी सांगितले की, कारखान्याच्या ८.६४.९६ हेक्टर जमिनीचे शासकीय मूल्य ४३ कोटी ३१ लाख होते, परंतु दोन वर्षांत २३९ कोटी रुपयांनी वाढवून दाखवून शासन आणि बँकांची फसवणूक केली गेली.
कारखाना स्वतःच्या उत्पन्नातून दरवर्षी एफआरपी भागवू शकत नाही; चालू वर्षात सभासदांचे ३१ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सर्व प्रश्नांची उत्तरे मागितली जातील.
Satej Patil Vs Amal Mahadik : ‘छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक व सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे कारखाना कर्जबाजारी झाला आहे. कारखाना मालकीच्या जमिनीची किंमत दोन वर्षांत २३९ कोटींनी वाढवून दाखवून शासनाची, बॅंकेची फसवणूक केली असल्याचा आरोप राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीचे समन्वयक दत्तात्रय उलपे यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.
सोमवारी (ता.२९) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सर्व प्रश्नांचा जाब विचारला जाणार आहे. सत्ताधाऱ्यांनी आम्हाला बोलू द्यावे, तेथे असलेल्या प्रश्न आणि उपप्रश्नांची उत्तरे द्यावीत, असेही आवाहनही करण्यात आले. आठ महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लेखी मिळालेल्या उत्तरावर असमाधान व्यक्त केले.